ग्रामपंचायत कार्यालय,गायवाडी
ग्रामपंचायत विषयी

भौगोलिक स्थान

गायवाडी हे गाव तालुक्याच्या ठिकाणा वरून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर वसले आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून येथील प्रमुख पिके कापूस, तुर, चना इ. आहे. योर्यल ७०% लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे.

सांस्कृतिक ओळख

गावाचे ग्रामदैवत इच्छापूर्ती माता असून दरवर्षी नवरात्रीमध्ये तेथे भव्य मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच दर्यापूर मधील रेल्वे स्टेशनवरून धावणारी "शकुंतला" ही इंग्रज कालीन रेल्वे ऐतिहासिक होऊन गेलेली आहे. जी एकेकाळी गावाच्या विकासाचा कणा होती. आणि जवळच असलेले दर्यापूर ते शहर स्पर्धा परीक्षांचे माहेर घर असल्यामुळे गावाचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप विकास झाला असून गावातील अनेक तरुण आज प्रशासकीय सेवेत कार्यरत आहे. तसेच विविध इतिहासकालीन मंदिरे,वास्तू इ.मुळे आजही गावाला वेगळी संस्कृतीक ओळख निर्माण झाली आहे.

दृष्टिकोन

एकात्मिक आणि सर्वसमावेशक गावाचा विकास करणे ज्यामध्ये उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण, स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, मजबूत पायाभूत सुविधा पर्यावरणाचे संवर्धन, महिलांचे सक्षमीकरण, युवकांना नवीन संधी उपलब्ध, आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याची समान संधी मिळेल.

ग्रामपंचायतीचा इतिहास

गायवाडी ग्रामपंचायतीची स्थापना सन १९६२ मध्ये झाली असून, पहिले सरपंच***** होऊन गेले. हागणदारी मुक्त गाव, तंटामुक्त गाव डिजीटल गाव, अशा विविध प्रकारच्या योजना कार्यक्रम राबवून गावाचा विकास साधण्यात ग्रामपंचायतने प्रयत्न केले आहे. गायवाडी ग्रामपंचायत ही विकासात्मक ददृष्टिकोण ठेवून गावाच्या विकासाच्या चळवळीत सदैव कार्यरत आहे.

ध्येय

ग्रामातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण इ. मूलभूत सोयी पुरवणे. तसेच शासनाच्या सर्व योजना पारदर्शकपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे. ग्रामातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि हरितग्राम असे उपक्रम राबवून ग्रामांचा विकास करणे. ग्रामपंचायतीचे प्रशासन डिजिटल पद्धतीने सक्षम करून लोकभिमुख करणे.

मूलभूत मुद्दे

पारदर्शकता : ग्रामपंचायतीच्या सर्व कामांमध्ये पारदर्शकता आणून “डिजिटल ग्रामपंचायत” सारख्या उपक्रमातून लोकाभिमुख करणे.

लोकसहभाग : ग्रामसभेच्या माध्यमातून सार्वजनिक निर्णय आणि प्रक्रियेमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग घेणे, ज्यामध्ये लोकांचे विचार, गरजा आणि मूल्ये इ. अधीन राहून गावाचा विकास करणे.

जबाबदारी : ग्रामपंचायतीच्या निर्णय, कृती, कार्य इ. ची योग्य प्रकारे अंमलबजावणी करून गावाच्या विकासाला गती देणे.

समानता : नागरिकांना समान संधी व न्यायिक अधिकार देणे तसेच वंश, धर्म, लिंग किंवा इतर कोणत्याही कारणास्तव कोणताही भेदभाव न करणे.

स्वच्छता व पर्यावरण संवर्धन : नैसर्गिक संसाधनांचा योग्य उपयोग करून पर्यावरणाचे संतुलन राखणे व स्वच्छ व हरित ग्राम निर्माण करणे.

प्रामाणिकपणा : प्रत्येक कार्यात प्रामाणिकपणा, नीतीमत्ता आणि सार्वजनिक हिताची भावना जपणे.

नवीन उपक्रम व नावीन्य : आरोग्य, शिक्षण, शेती, स्वच्छता व सामाजिक-आर्थिक बाबींचा विचार करून उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून गावाच्या विकासाला गती देणे.

सेवाभाव : नागरिकांप्रती प्रेम, सहानुभूती, सहवेदना व एकात्मतेची भावना ठेवून निःस्वार्थपणे कार्य करून लोकाभिमुख सेवा पुरवणे.

📍 ग्रामपंचायत कार्यालयाचे स्थान